लोकसभा निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान आज महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर डेक्कन येथे नदी पात्रात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधी कोथरूड ते डेक्कन या मार्गावर भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आमदार माधुरी मिसाळ आणि अन्य भाजप व महायुतीचे नेते उपस्थित होते.
पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तसेच विरोधात समोर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे असणार आहेत. आज मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतले. तसेच पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज हे विकासाच्या रूपात परतफेड करणार असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.