Hingoli Loksabha 2024 : आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे.
महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये आता महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी निवडणूक होत आहे. हिंगोलीत मतदानाला सुरूवात झाली असून या मतदारसंघात शिंदे विरूद्ध ठाकरे अशी लढत पाहायला मिळत आहे.
हिंगोली मतदारसंघात महाविकासआघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर तर महायुतीकडून महायुतीकडून शिंदे गटाचे बाबुराव कदम होळीकर हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. तर आता हिंगोलीमध्ये ठाकरे की शिंदे कोणाचं भवितव्य मतपेटीत बंद होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.