लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे.
आजच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी, नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावत त्यांनी जनतेला मतदान करण्यासाठी प्रेरित केले आहे. यामध्ये आता नारायण मूर्ती यांनीही मतदान केले आहे.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील बीईएस मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले आहे.
दरम्यान, आज कर्नाटकातील 14 लोकसभेच्या जागांवर मतदान होत आहे.