Loksabha Election Maharashtra Poll Percentage : आज सकाळी 7.०० पासून राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. आज महाराष्ट्रात ८ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान झाले आहे. तर आता आपण कोणत्या टप्प्यात किती टक्के मतदान झाले आहे याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे:
हिंगोली – 7.23 टक्के
परभणी – 9.72 टक्के
नांदेड – 7.73 टक्के
वर्धा – 7.18 टक्के
अकोला – 7.17 टक्के
बुलढाणा – 6.61 टक्के
अमरावती – 6.34 टक्के
यवतमाळ-वाशिम – 7.23 टक्के