Ashok Chavan : आजच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे.
आजच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अशोक चव्हाण हे त्यांच्या पत्नीसह मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी चव्हानांनी पत्नीसह मतदान केले.
मतदान केल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, निवडणुकीत मतदान करणे हे एक पवित्र काम आहे. मी देखील मतदानाचा अधिकार बजावत आहे. नागरिकांची साथ आम्हाला नक्की मिळेल. लोकं माझ्यासोबत आहेत, आम्हाला नागरिकांची साथ नक्की मिळेल, असं चव्हाण म्हणाले.