आज देशभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. ७ टप्प्यांपैकी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ८ जागांवर मतदान होत आहे. दरम्यान मराठी बिग बॉस विजेता आणि अभिनेता शिव ठाकरेने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मूळचा अमरावतीचा असलेल्या शिव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
शिव ठाकरेने मतदान केल्यानंतर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देखील नागरिकांना त्याने केले आहे. मी मुंबईवरून मतदान करण्यासाठी आलो आहे. प्रत्येक तरुणाने मतदान केले पाहिजे असे आवाहन शिव ठाकरेने केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.