लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. मात्र देशभरात पाहिल्यास महाराष्ट्रातील मतदारांनी थंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत केवळ 31.77 टक्केच मतदान झाल्याचे दिसून येत आहे .
महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मात्र कडक उन्हाळ्यामुळे आणि अन्य कारणांमुळे ८ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला दिसून येत नाहीये.
८ लोकसभा मतदार संघापैकी मतदानाची आकडेवारी जाऊन घेतल्यास वर्ध्यात ३२.३२ %, अकोल्यात ३२.२५ %, अमरावतीत ३१.४०%, बुलढाण्यात २९.०७ %, हिंगोलीत ३०.४६ %, नांदेडमध्ये ३२.९३ %, परभणीत ३२.९३ %, यवतमाळ-वाशिममध्ये ३१.४७ % इतके मतदान दुपारी १ पर्यंत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मतदारांनी थंड प्रतिसाद दिलेला दिसतोय, १ वाजेपर्यंत एकूण ३१.७७ टक्केच मतदान झाल्याचे दिसून आले आहे.