PM Narendra Modi : पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दरम्यान, पीएम मोदींनी मालदा जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ममता सरकारवर निशाणा साधला. एक काळ असा होता की बंगालने संपूर्ण देशाचा विकास केला, पण आधी डाव्यांनी आणि नंतर तृणमूलने बंगालच्या मोठेपणाला धक्का लावला, बंगालचा विकास थांबवला, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
पीएम किसान सन्मान निधीचे 8 हजार कोटी रुपये थेट बंगालमधील 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत, पण टीएमसी सरकार तुम्हाला लुबाडण्याची एकही संधी सोडत नाही, असेही पंतप्रधानांनी रॅलीत सांगितले. बंगालच्या विकासासाठी मी केंद्रातून बंगाल सरकारला जो पैसा पाठवतो तो टीएमसीचे नेते आणि मंत्री मिळून खातात, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली.
पुढे ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसने येथील महिलांचा सर्वात मोठा विश्वासघात केला आहे. मुस्लिम भगिनींना अत्याचारापासून वाचवण्यासाठी आमच्या सरकारने तिहेरी तलाक रद्द केला, तेव्हा याला टीएमसीने विरोध केला. संदेशखळीमध्ये महिलांवर अनेक अत्याचार झाले आणि टीएमसी सरकारने मुख्य आरोपीला शेवटपर्यंत वाचवले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.