Govinda-Krishna Abhishek : आज कॉमेडी किंग कृष्णा अभिषेकची बहीण आणि बिग बॉस 13 फेम आरती सिंहने आज (25 एप्रिल) मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात बिझनेसमन दीपक चौहानसोबत लग्नगाठ बांधली. यावेळी आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
आरतीच्या या खास लग्नसोहळ्यात देवोलिना भट्टाचार्जी, शेफाली जरीवाला, बाबा सिद्दीकी, अंकित गुप्ता, कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंग, बिपाशा बसू, करण सिंग ग्रोवर, शहजादा धामी, प्रियांका चहर चौधरी सहभागी झाले होते. तर या लग्नात ज्या व्यक्तीची सर्वाधिक प्रतिक्षा होती तो म्हणजे गोविंदा. गोविंदा आपला मुलगा यशवर्धनसोबत लग्नाला आला होता. त्याच्या येण्याने कृष्णा आणि कश्मिरा खूप खुश दिसत होते.
कृष्णा अभिषेक आणि गोविंदा या मामा-भाच्यातील भांडण सर्वांनाच माहीत आहे. हे भांडण मागे सोडून गोविंदा आणि त्याच्या मुलांनी लग्नाला हजेरी लावली होती.
इन्स्टंट बॉलीवूडशी बोलताना कृष्णा आपल्या गोविंदा मामाच्या उपस्थितीबद्दल म्हणाला की, मामा लग्नाला आल्याचा मला खूप आनंद झाला. त्यांना पाहून छान वाटले. ही खरी मनाची गोष्ट आहे. आमचा भावनिक संबंध आहे, त्यामुळे त्यांना पाहून खूप आनंद झाला. त्याचवेळी कश्मिराला विचारण्यात आले की तिने गोविंदाचे आशीर्वाद घेतले का? यावर ती म्हणालाी “हे काय सांगण्यासारखे आहे का? ते खूप गोड आहेत. त्यांनी मला आणि माझ्या मुलांनाही आशीर्वाद दिला. मी खूप आनंदी आहे,” असे कश्मिरा म्हणाली.