आज देशभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. ७ टप्प्यांपैकी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ८ जागांवर मतदान होत आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी बंगलोर येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर आज मतदान होत आहे. मात्र एकूणच ४ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी फारशी झालेली दिसून येत नाहीये.