*समर्थांची मूर्ती पुनरपि जगी प्रकटली* ..
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज….
प्रयत्नांनी नराचा नारायण म्हणजेच माणसाचा देव कसा होतो ते श्रीधरस्वामी यांच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळेल. यांचे संपूर्ण नाव श्रीधर नारायण पत्की देगलूरकर होते.यांचा जन्म ७डिसेंबर १९ ०८ रोजी नांदेड जिल्ह्यातील लाड चिंचोली येथे मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंतीच्या दिवशी झाला. यांच्या वडिलांचे नाव नारायणराव आणि आईचे नाव कमलाबाई होते. ते लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पश्चात त्यांच्या आईने त्यांचे संगोपन केले. त्यांना लहानपणापासून कथा कीर्तनाची आवड होती.
कोणतीही गोष्ट हि मनापासून करायची हे तर श्रीधरच्या रक्तातच होते. त्यामुळे श्रीधर अखंड नामस्मरणात तल्लीन राहू लागला. श्रीधरला गणिताची जास्त काळजी वाटत होती. ही काळजी करता करताच त्याचे तोंडाने “राम राम” म्हणणे चालू असे. पाटीवरचा हात चालता चालता नकळत थांबे आणि केवळ तोंडाने “राम राम” चालू राही. हळू हळू त्याला “राम राम” म्हण्यातच गोडी वाटू लागली. तसा तसा त्याला मनातून मोठा आनंद होऊ लागला. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा I आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणाना II त्यावेळी बघणार्यांना वाटले असेल की पुढे फोफावणार्या प्रचंड वैराग्यवृक्षाचे हे कोवळे कोंब आहेत. बाकीच्यांच्या अडचणी सोडवण्यातच श्रीधरचा वेळ जास्त जाई. कहर असा कि यामुळे परोपकारी व निस्वार्थी स्वभावामुळे त्याला पुण्यात अनाथाश्रमात सगळ्यांनी “स्वामी” म्हण्यास सुरवात केली. .
कालांतराने त्यांची शाळेतील एक शिक्षक श्री. पळणीटकर गुरुजी यांच्याशी चांगली ओळख झाली. श्रीधर यांचा अध्यात्म वादाकडे असलेला खोल कल पाहून त्यांनी त्यांना समर्थ रामदास स्वामीजींचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला. हे भगवान श्रीरामांचे अनन्य भक्त आणि समर्थ रामदास स्वामी स्वामींचे शिष्य होते. नवरात्र दसऱ्याच्या दिवशी पुणे सोडून श्रीधर सज्जनगडावर चालत चालत पोहोचले .त्यावेळच्या गडावरील व्यवस्थापकांनी त्या किशोरवयीन श्रीधरची सेवावृत्तीची, शिष्य म्हणून तयारीसाठीची अत्यंत कठोरपणे परीक्षा घेतली. गडावर श्रीधर बुवा रामदासी म्हणून वास्तव्य केले.
अशा कठोर परिश्रमानंतर दास नवमीच्या दिवशी सद्गुरूंच्या या परमप्रिय अनन्य भक्त शिष्याला श्रीधरबुवांना स्वामी समर्थांचे दर्शन झाले. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले एक शिष्य होते . त्यांच्या आज्ञेनुसार ते घनदाट अरण्यातून गोकर्ण महाबळेश्वरला गेले आणि तिथे त्यांची भेट शिवानंद योगींशी झाली.त्यांनी तेथे तपश्चर्या केली.श्रीधर स्वामींनी १३ वर्ष एकांतावास स्वीकारला होता. १९६० ते १९७३. सज्जनगडावर ३ वर्ष, हिमालयात बद्रीस २ वर्ष, नर्मदा किनारी होशंगाबाद येथे १ वर्ष, वरद्पूर आश्रमात ७ वर्ष. शिवानंद स्वामींनी देह ठेवल्यावर शिवेहळणीला मठाची व्यवस्था श्रीधर यांनी पाहिली. नंतर ते पुन्हा गडावर आले
. महाराष्ट्रात भ्रमण करून पुन्हा त्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर संन्यास दीक्षा घेतली. या काळात श्रीधर हे श्रीधरस्वामी म्हणून प्रसिद्ध झाले.श्रीधर स्वामी हे संन्याशी होते. संन्याशी असे श्रीधर षडविकारांवर विजय संपादन करून नेहेमी आत्मानंदात रममाण तसेच त्यांना जगद्गुरु शंकराचार्यांनी दर्शन दिले आणि त्यांनी ब्रम्हासनावर स्थानापन्न केले. अत्यंत प्रतिभाशाली , मराठी, संस्कृत, कन्नड़, हिंदी इंग्रजी मध्ये पारंगत असलेले श्रीधर स्वामी महाराज हे मराठी आणि कन्नड संत कवी होते. संस्कृत व मराठी संस्कृत व मराठी भाषेतून तत्त्वज्ञान पर चिंतन त्यांनी ग्रंथरूपाने लिहिले. समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली.श्रीधर स्वामींनी सतत १२ वर्षे भारत भ्रमण केले होते.
समर्थांच्या वाङ्मयाचा तत्त्वज्ञानाचा प्रसार सुरू केला. श्रीधरस्वामी दत्ताचा अवतार मानले जातात . वरदपूर या पुण्यभूमीवर श्रीधर आश्रम स्थापन केला .लोकांच्या अडीअडचणी उपासना मार्गाने सोडवण्यासाठी ते मार्गदर्शन करू लागले .”प्रपंची ते भाग्य.. परमार्थी वैराग्य “असा ते उपदेश करतात. श्रीधर स्वामी महाराज हे मराठी आणि कन्नड संत कवी होते.श्रीधर स्वामीजींचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत.त्यांनी जटिल वैदिक शिक्षण सामान्य माणसाच्यासाठी अतिशय सोपे केले . आर्य संस्कृती, ज्ञान योग, अमृतवाणी, मधुरवाणी, स्वामींची शतपत्रे, स्वात्मानिरुपण,विवेकोदय, भक्तियोग, दत्त करुणार्णव, शिवाशांत स्तोत्र, श्रीराम पाठ,…. अशा वैविध्यपूर्ण ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे
. ६५ वर्षांचा कालखंड… “देवाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो ” या जाणिवेने त्यांनी आपल्या जीवनाचा सुनियोजित आराखडा तयार केला होता. चैत्र वैद्य द्वितीयाला दिनांक 19 एप्रिल 1973रोजी सकाळी ॐ चा तीन वेळा उच्चार करून श्रीधर स्वामी यांनी देहत्याग करत त्यांचे महानिर्वाण झाले .
नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे। स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः।
मुग्धा कानिटकर, सांगली
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत