लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. तर आज सामान्य जनतेसह अनेक नेते, सेलिब्रिटी, खेळाडूंनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये माजी भारतीय कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बंगळुरू येथे मतदान केले. मतदान केंद्रावर सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहून राहुल द्रविड यांनी मतदान केले. त्यांच्या या कृतीने सर्व लोकांची मने जिंकली आहेत.
मतदान केल्यानंतर द्रविड यांनी माध्यमांशी संवाद साधला “प्रत्येकाने बाहेर पडून मतदान केले पाहिजे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाहीत आपल्याला ही संधी मिळते,” असे ते म्हणाले. द्रविड यांच्यासोबतच त्यांचे माजी सहकारी आणि महान भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीही बेंगळुरूमध्ये मतदान केले.
https://twitter.com/FunMauji/status/1783733581938045365
कर्नाटकात लोकसभेच्या 14 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. कर्नाटकात आज लोकसभेच्या 14 जागांवर मतदान पार पडले. उडुपी चिकमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बेंगळुरू ग्रामीण, बेंगळुरू उत्तर, बेंगळुरू मध्य, बेंगळुरू दक्षिण, चिकबल्लापूर आणि कोलार या जागांवर मतदान झाले.