दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असतानाच EVM मशीन बाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने EVM VVPAT बाबत महत्वाचा निर्णय दिला आहे. तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळून लावली आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी बंगालमधील मालदा येथे बोलत होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अररिया येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आरजेडीवर निशाणा साधला आणि आरजेडीने लोकांकडून मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”आपल्या देशातील साधनसंपत्तीवर या देशातील गरिबांचा पहिला हक्क आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत… व्होट बँकेसाठी काँग्रेस भारतातील हिंदूंशी ज्या प्रकारे पक्षपात करत होती ते आज उघड झाले आहे. एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा कट काँग्रेसने रचला आहे आणि हे मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण असू शकत नाही. पण काँग्रेस धर्माधारित आरक्षण लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, देशात आरक्षणाचे कर्नाटक मॉडेल लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आर्थिक स्थितीची पर्वा न करता कर्नाटकातील सर्व मुस्लिमांचा विश्वासघात केला आहे . काँग्रेसला बिहार आणि देशाच्या इतर भागातही असेच करायचे आहे.
दरम्यान, VVPAT ची पडताळणी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. EVM बाबत काही संघटनांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मध्ये छेडछाड करणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर पडताळणी करून सुप्रिम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.