लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलांनी मोठी कामगिरी केली आहे. बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरच्या नौपोरा भागात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत. अजूनही चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलांच्या घेऱ्यात आणखी अनेक दहशतवादी अडकले असल्याचे सांगितले जात आहे.
माहिती मिळाल्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी मिळून शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. गुरुवारी रात्री अंधार पडल्याने चकमक थांबली. शुक्रवारी सकाळ होताच पुन्हा एकदा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. आतापर्यंत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर दोन जवानही जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांच्या घेऱ्यात अजूनही आणखी दहशतवादी सांगितले जात आहे.