लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान अखेर ६ वाजता संपले आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदान पार पडले. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. दरम्यान संध्याकाळी ६ वाजता मतदान संपले आहे. देशभरात आज ८८ जागांसाठी एकूण ६१ टक्के मतदान झाले आहे.
काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे कदाचित काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे मतदान कमी झाले असावे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या राज्यनिहाय मतदानाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्रिपुरामध्ये सर्वाधिक 76.23 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 52.64 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मणिपूरमध्ये 76.06 टक्के, छत्तीसगडमध्ये 72.13 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 71.84 टक्के, आसाममध्ये 70.66, जम्मू आणि काश्मीरमध्ये 67.22, केरळमध्ये 63.97, कर्नाटकमध्ये 63.90, 59.19 आणि राजस्थानमध्ये 59.19 टक्के, महाराष्ट्रात 83.5 टक्के, मध्य प्रदेशात 83.5 टक्के. बिहारमध्ये 53.03 टक्के लोकांनी मतदान केले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. तिरुवनंतपुरममधून ते काँग्रेसचे शशी थरूर यांच्याशी निवडणूक लढवत आहेत. रामायण मालिकेतील अभिनेने अरुण गोविल, अभिनेत्री हेमा मालिनी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तेजस्वी सूर्या आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हेही रिंगणात आहेत.