लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान अखेर ६ वाजता संपले आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदान पार पडले. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान झाले. दरम्यान संध्याकाळी ६ वाजता मतदान संपले आहे. महाराष्ट्रत आज ८ जागांसाठी एकूण ५३ टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ वाशीम, परभणी, वर्धा, बुलढाणा या ८ लोकसभा मतदारसंघाचा दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये समावेश होता. ८ लोकसभा मतदार संघापैकी मतदानाची आकडेवारी जाऊन घेतल्यास वर्ध्यात ३२.३२ %, अकोल्यात ३२.२५ %, अमरावतीत ३१.४०%, बुलढाण्यात २९.०७ %, हिंगोलीत ३०.४६ %, नांदेडमध्ये ३२.९३ %, परभणीत ३२.९३ %, यवतमाळ-वाशिममध्ये ३१.४७ % इतके मतदान दुपारी १ पर्यंत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मतदारांनी थंड प्रतिसाद दिलेला दिसतोय. पहिल्या टप्प्यापेक्षा यावेळेस कमी मतदान झालेले पाह्यला मिळत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. तिरुवनंतपुरममधून ते काँग्रेसचे शशी थरूर यांच्याशी निवडणूक लढवत आहेत. रामायण मालिकेतील अभिनेने अरुण गोविल, अभिनेत्री हेमा मालिनी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तेजस्वी सूर्या आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हेही रिंगणात आहेत.