तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात.येत आहेत.लोकसभा निवडणुकीत 400 पार करण्याचा आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी आज संध्याकाळी पंतप्रधान महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. संध्याकाळी ते या दोन्ही राज्यांमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील. भाजपने आपल्या X हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणूक दौऱ्याचे वेळापत्रक शेअर केले आहे.
कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज तपोवन मैदान कोल्हापूर येथे होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
भाजपच्या एक्स हँडलनुसार, पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता कोल्हापुर, महाराष्ट्र येथे निवडणूक रॅलीला संबोधित करतील. यानंतर ते दक्षिण गोव्याला जाणार आहेत. सायंकाळी ७ वाजता दक्षिण गोव्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आता पुढच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला दिसून येत आहेत.