आज दिल्ली इथल्या भारतीय जनता पक्षाच्या विस्तार मुख्यालयात शनिवारी शीख समुदायातील 1500 हून अधिक लोकांनी पक्षात प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस तरुण चुग यांच्या उपस्थितीत सर्वांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले.यावेळी पक्षाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा आणि भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा देखील उपस्थित होते.
यावेळी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नवीन सदस्यांना संबोधित करताना सांगितले की, आमच्या शीख बांधवांनी देशासाठी कसे बलिदान दिले हे आम्हाला माहीत आहे. देशावरील सर्व हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आणि विजय मिळवण्यात शीख बांधवांनी मोठे योगदान दिले आहे. शीख समाजातील अशा लोकांनी भाजपमध्ये प्रवेश करणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
ते म्हणाले की, भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याद्वारे आपण देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा पुढे नेऊ शकतो. यामध्ये तुमचे खूप मोठे योगदान आहे, तुमच्या सहभागाने आम्ही हे काम अधिक वेगाने पुढे नेऊ. ते म्हणाले की, शीख समुदायासाठी खरोखर कोणी काम केले असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मोदी हे प्रदीर्घ काळ पंजाबचे प्रभारी होते, त्यामुळे त्यांना शीख समाजाबद्दल खूप आपुलकी आहे. जेपी नड्डा म्हणाले की, 1984 मध्ये ज्याप्रकारे माणुसकी आणि मानवतेची गळचेपी झाली ते आपण सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधान मोदींनी 1984 च्या दंगलीवर एसआयटी स्थापन केली आणि आज त्या दंगलीचे दोषी तुरुंगात आहेत.
तुमचे योगदान ओळखणे, त्याचा आदर करणे आणि तुम्हाला मुख्य प्रवाहात समाविष्ट करून पूर्ण ताकदीने पुढे नेणे शक्य असेल तर ते फक्त भाजपमध्येच शक्य आहे, असे नड्डा म्हणाले. शीख समाजाचे लोक भाजपमध्ये सामील होणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याद्वारे आपण देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता वाढवू शकतो. यामध्ये तुमचे खूप मोठे योगदान आहे, तुमच्या सहभागाने आम्ही हे काम अधिक वेगाने पुढे नेऊ.
सध्या चालू असलेल्या लोकसभांच्या वातावरणात आणि दिल्लीमध्ये चालू असलेल्या आम आदमी पार्टीच्या गोंधळात ही घटना महत्वाची मानली जात आहे.