शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका पाहायला मिळत आहे. भारतीय पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदके जिंकली आहेत.शनिवारी कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात चार सुवर्णपदके मिळवून, पुरुष आणि महिला संघ आणि मिश्र सांघिक स्पर्धकांनी देशाचे नाव उंचावले.भारतीय महिला कंपाउंड संघाने इटलीचा 236-225 असा पराभव केला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर या भारतीय तीन खेळाडूंनी सहाव्या मानांकित इटलीचा मोठ्या फरकाने पराभव केला.
“@VJSurekha टीम इंडियासाठी सर्वोच्च राज्य करते! तिने शांघाय येथे # ArcheryWorldCup स्टेज 1 मध्ये तिसरे सुवर्ण जिंकले! 146-146 असा स्कोअर बरोबरीत राहिल्यानंतर तिरंदाजाने मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला टायब्रेकरमध्ये पराभूत केले आणि भारताचे चौथे सुवर्णपदक जिंकले स्पर्धा! #Indian Archery,” असे ट्विट भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात एसआयए ने केले आहे.
पुरुष संघात अभिषेक वर्मा, प्रथमेश फुगे आणि प्रियांश यांचा समावेश असलेल्या पुरुष संघाने आणखी एका चुरशीच्या झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत नेदरलँड्सचा २३८-२३१ असा पराभव करून भारताला कंपाऊंड विभागात दुसरे पदक मिळाले.
प्रथम, ज्योती सुरेखा, अदिती गोस्वामी आणि परनीत यांचा समावेश असलेल्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने अव्वल पारितोषिकासाठी अत्यंत चुरशीच्या लढतीत इटलीला २३६-२२६ ने पराभूत करून सुवर्णपदक मिळवून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
कंपाऊंड विभागातील विजयांची हॅट्ट्रिक पूर्ण झाली आणि अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा यांच्या मिश्र संघाने रोमहर्षक सुवर्णपदकाच्या लढतीत एस्टोनियाचा एका गुणाने (158-157) पराभव केल्याने तिरंगा उजळला आणि भारताला एकूण तिसरे स्थान मिळाले.
तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा आणि प्रवीण जाधव यांच्या भारतीय पुरुष रिकर्व्ह तिरंदाजी संघाने गुरुवारी शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला.त्यांनी इटलीचा 5-1 असा पराभव करून रविवारी होणाऱ्या दक्षिण कोरियाशी विजेतेपदाचा सामना निश्चित केला.
भारतीय तिरंदाजी असोसिएशन (AAI) नुसार, संघाने जागतिक क्रमवारीत सुधारणा केली आहे ज्यामुळे त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्यात मदत कोणती आहे.