लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला धार चढली आहे. पंतप्रधान मोदी काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यावर टीका करत आहेत. दरम्यान याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चौफेर बाजूनी खर्गे यांनी भाजपा व मोदींवर टीका केली आहे. दरम्यान मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. माध्यमांशी संवाद साधताना खर्गे म्हणाले, ”भाजपने कधीही भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही, तर काँग्रेस हा भारताला स्वतंत्र करणाऱ्यांचा पक्ष आहे. पंतप्रधान मोदी जे बोलले त्यातील एकही निवडणूक आश्वासन त्यांनी अंमलात आणले नाही.तरीही ते म्हणतात की मोदींनी देशासाठी खूप काम केले. काँग्रेस हा ज्यांनी भारत स्वतंत्र केला त्यांचा पक्ष आहे. भाजपाने स्वातंत्र्यासाठी काहीही लढा दिलेला नाही.”
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी हे भाजपात प्रवेश करत आहेत. पक्ष सोडून जाणार्यांवर देखील खर्गें यांनी टीका केली आहे. काँग्रेस पक्ष इतका वाईट आहे तर ३० ते ४० वर्ष या पक्षात का वाया घालवली अशी टीका खर्गे यांनी पक्ष सोडून जाणार्यांवर केली आहे.