छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील ‘रोशन सिंह सोढी’ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. गुरुचरण सिंह हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र 22 एप्रिल रोजी ते दिल्लीहून मुंबईला रवाना झाले होते, एवढीच माहिती आतापर्यंत मिळाली आहे. त्यानंतर कुणालाही ते दिसलेले अथवा भेटलेले नाहीत.
या प्रकरणी गुरुचरणच्या वडिलांनी 25 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील पालम पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यान पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यात गुरचरण सिंग तेथून जाताना दिसत आहेत.दिल्ली विमानतळावरुन फ्लाइट पकडण्यासाठी ते घरातूनही बाहेर पडला होते. मात्र ते मुंबईत पोचले नाहीत. .अभिनेत्याचा फोनही २४ एप्रिलपर्यंत कार्यरत होता, मात्र आता तो बंद असल्याचे सांगत आहे.
गुरुचरण लवकरच सुखरुप घरी पोचतील अशी प्रार्थना त्यांचे मित्र आणि नातेवाईक करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर चाहतेही अभिनेत्याने लवकरात लवकर घरी परतावं, याकरता प्रार्थना करत आहेत.
गुरुचरण यांचे वडील हरगीत सिंह म्हणाले, ‘एसएचओने त्यांना फोन केला आहे आणि लवकरच माझ्या मुलाला शोधून काढू असे आश्वासन दिले आहे. मला आशा आहे की गुरचरण ठीक आहे आणि आनंदी आहे. या क्षणी तो कुठेही असला तरी देव चा रक्षण करो.सोढी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्टही केली होती.
तारक मेहता का उल्टा चष्मा’यामालिकेमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले होते. मात्र, काही काळापूर्वी त्यांनी हा शो सोडला होता आणि या शोसोबतच त्यांनी इंडस्ट्रीलाही अलविदा केला होता.