महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई,ठाणे आणि कोकणात आजपासून पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
उत्तर कोकणात उद्या व पर्वा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसवर जाण्याचा अंदाज आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ भागात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.