झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. रांचीच्या विशेष पीएमएलए कोर्टाने जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. हेमंत सोरेनने आपल्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयात १३ दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. हेमंत सोरेन यांनी २९ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सोरेन यांना ९ वेळा समन्स धाडले होते. त्यानंतर ईडीने त्यांची तब्बल सहा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. दरम्यान हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. आता झारखंडचा राज्यकारभार चंपई सोरेन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.