Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणूक सुरू असतानाच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत हातमिळवणी केल्यामुळे आपण राजीनाम देत असल्याचं अरविंदर सिंग लवली यांनी सांगितलं. तसेच लवली यांचे दिल्ली काँग्रेस प्रभारी महासचिव दीपक बबरिया यांच्यासोबत वाद सुरू होते, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्या असल्याचं म्हटलं जात आहे.
अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या राजीनाम्याचं कारण सांगतलं आहे. पत्रात लवली यांनी लिहिले आहे की, दिल्लीत काँग्रेस ज्या पक्षाच्या विरोधात होता त्याच पक्षासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. तसेच आप पक्ष काँग्रेसला खोटारडा पक्ष म्हणत होता, पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत होता, त्याच पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केली आहे.
मी पक्षाच्या या निर्णयाचा सन्मान केला. महासचिवांनी दिलेल्या आदेशाने मी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या रात्री सुभाष चोपडा आणि संदीप दीक्षित यांच्यासोबत घरी गेलो होतो. माझी इच्छा नव्हती तरी देखील मी गेलो होतो, असं अरविंदर सिंग लवली म्हणाले.
जड अंतकरनाने मी हे पत्र लिहित आहे. काँग्रेस पक्षात मी स्वत:ला लाचार समजत आहे. त्यामुळे मी आता दिल्लीच्या अध्यक्षपदावर राहू शकत नाही, असंही लवली म्हणाले.