दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, भ्रष्टाचाराच्या दोन वेगवेगळ्या आरोपांप्रकरणी देशातील या दोन मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना अटकेपूर्वी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज ह्या दोघांच्या अटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे..
त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करणार आहे. दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिले आहे. तर आपल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर झारखंड उच्च न्यायालय निकाल देण्यास विलंब करत असल्याचे सोरेन यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च आणि हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारीला अटक केली होती.
३१ जानेवारी २०२४ ला झारखंड मधील जमीन आणि खाण घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर चौकशी आणि तपासाचा दोर आवळल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. . इतकेच नाही, तर राज्यात उलटे फासे पडून हेमंत सोरेन यांना आपली पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची बनवण्याचा मनसूबा सोडून द्यावा लागला होता. त्याचबरोबर झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ नेतेपदी ज्येष्ठ मंत्री म्हणून चंपई सोरेन यांची मुख्यमंत्री पदावर निवड करावी लागली होती.
२१ मार्च रोजी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवून, सत्ता काबीज करणाऱ्या केजरीवालांना भ्रष्टाचाराच्या आरोपातच ईडीनं अटक केली होती. दिल्लीतल्या कथित दारु घोटाळा प्रकरणात ईडीने केजरीवालांना बेड्या ठोकल्या आहेत.ईडीने केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल मुख्य सूत्रधार आहेत. अरविंद केजरीवालांना निवडणुकीत फंड हवा होता. तसेच हा मद्य घोटाळा 100 नाही तर 600 कोटींचा आहे. गोवा निवडणुकीत मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला गेला. गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले. गोव्याला 4 मार्गांनी पैसे पाठवले, यासाठी हवालाचाही वापर झाला.केजरीवालांनी इतर नेत्यांशी मिळून हा कट रचला, असा आरोप ईडीने आपल्या युक्तिवादातून केजरीवालांवर केला होता.