RCB vs GT : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 45व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा 9 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीचे अर्धशतक आणि विक जॅकच्या स्फोटक शतकाच्या जोरावर आरसीबीने दमदार असा विजय मिळवला. गुजरातने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बेंगळुरू संघाने अवघ्या 16 षटकांत 1 गडी गमावून 206 धावा करत सामना जिंकला.
आरसीबीसाठी विल जॅकने 41 चेंडूत पाच चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद शतक झळकावले. तर कोहलीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर सामन्याच्या सुरुवातीला साई सुदर्शन (नाबाद 84) आणि शाहरुख खान (58) यांच्या शानदार अर्धशतकांमुळे आणि तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे गुजरात टायटन्सने 20 षटकात तीन विकेट्स राखून विजय मिळवला.
बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. तर दुसरीकडे शाहरुख आणि सुदर्शनने मिळून गुजरातचा वेग वाढवला. शाहरुख बाद झाल्यानंतर मिलर आला आणि सुदर्शनच्या साथीने गुजरातचा डाव 200 धावांपर्यंत नेला. ऋद्धिमान साहा 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सुदर्शन आणि शाहरुखने चांगली भागीदारी केली आणि कर्णधार शुभमन गिलने 16 धावा करत 45 धावांपर्यंत मजल मारली. सुदर्शनने 49 चेंडूत आठ चौकार आणि चार षटकार मारले तर शाहरुखने 30 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकार ठोकले. शाहरुख बाद झाल्यानंतर सुदर्शनला साथ देण्यासाठी डेव्हिड मिलर आला, त्याने 19 चेंडूत नाबाद 26 धावा करत गुजरातला 200 पर्यंत नेले. मिलरने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला.