PM Narendra Modi : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. सर्व पक्षांचे बडे नेते राज्यांमध्ये जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन, प्रचार सभा घेताना दिसत आहेत. यामध्येच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज18 ग्रुपला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांची भविष्यातील तीन ध्येय कोणती आहेत ते सांगितले.
मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मली तीन गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पहिली म्हणजे प्रत्येक घरातील वीज खर्च शून्य झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त असलेली वीज विकून पैसे कमवले पाहिजेत. तर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचं आहे.
लोकांचा वाहतूक आणि वीज यावर होणारा खर्च शून्यावर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच जर केंद्रात तिसऱ्यांदा आपले सरकार स्थापन झाले तर भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आपले प्राधान्य असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने येत आहेत. तसेच घराघरात अक्षय उर्जेरिन्यूएबलची सुविधा मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलवरील पैसे खर्च करण्याऐवजी घऱी स्कूटर आणि कार चार्ज करू शकतील. तसेच प्रत्येक घराच्या छतावर सोलर पॅनल लावावेत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.