लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधून भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना तिकीट दिले आहे. मनसेने नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. नारायण राणे यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचारसभा घेणार आहेत. ४ मे रोजी राज ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणार आहेत.
कणकवली येथे ही सभा होणार आहे. कणकवलीच्या उपरुग्णालयाच्या समोर असणाऱ्या मैदानात ही सभा होणार आहे. त्यामुळे अखेर राज ठाकरे हे महायुतीच्या बाजूने प्रचारात उतरणार आहे हे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे. विनायक राऊत या जागेवरून सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यंदाची लढत ही चुरशीची होणार आहे.