दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता आणि कॅबिनेट मंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवारी तिहार तुरुंगात त्यांची भेट घेतली.. मागच्या आठवड्यात सुनीता केजरीवाल, यांना त्यांचे पती केजरीवाल यांना भेटण्यास परवानगी तिहार तुरुंग प्रशासनाकडून नाकारण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना परवानगी देण्यात आली होती.
या बैठकीनंतर मंत्री आतिशी म्हणाल्या की, तुरुंगात असतानाही अरविंद केजरीवाल यांना स्वतःची नाही तर दिल्लीच्या दोन कोटी जनतेची चिंता आहे., तुरुंगाच्या संपूर्ण भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत अपडेट्स घेतले.
तसेच तुरुंगातून अरविंद केजरीवाल यांनी त्यांना उन्हाळ्यात दिल्लीत पाण्याची कमतरता भासणार नाही आणि जनतेला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील महिलांना संदेश दिला की ते लवकरच तुरुंगातून बाहेर येतील आणि दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याचे वचन निश्चितपणे पूर्ण करतील.असेही अतिशी यांनी सांगितले.
तुरुंगातून अरविंद केजरीवाल यांनीही आमदारांना सूचना दिल्या आणि सर्व आमदारांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघांची सतत पाहणी करावी, जनतेला भेटून त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे सांगितले.
केजरीवाल तुरुंगातून दिल्ली सरकार चालवत असल्याने दिल्लीचे दोन मंत्री दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांना भेटतील यासाठी परवानगी मिळाल्याचे आपकडून सांगण्यात आले आहे.
मंगळवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तिहार तुरुंगात जाऊन अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. याआधी दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही तिहार तुरुंगात जाऊन अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे, गेल्या काही दिवसांत पंजाब आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्री ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल यांना भेटत आहेत, त्यावरून केजरीवाल निवडणुकीसाठी कुठलीतरी रणनीती आखत असल्याचे स्पष्ट होत आहे.