माढा लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. कारण या ठिकाणी होणारी पक्षांतर किंवा पक्ष बदल हे आता सातत्याने घडून येताना दिसत आहे. उमेदवारी न दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात गेले. त्यानंतर त्यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान तिथे राजकारण सुरु असतानाच पंढरपूरमधील शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता वर्तवला जात आहे. कारण अभिजित पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर या चर्चाना उधाण आले आहे.
श्री विठ्ठल साखर कारखान्याचे गोडाऊन राज्य सहकारी बँकेकडून सील करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जाऊ शकतो असे विधान केल्याने ते आता भाजपात जाणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तुम्ही भाजपात प्रवेश करणार का असा प्रश्न त्यानं विचारण्यात आला.
अभिजित पाटील म्हणाले, ”माझ्या भाजपा प्रवेशाची आज कोणतिही चर्चा झालेली नाही. कारखान्याला मदतीची गरज आहे आणि त्यासाठी गोडाऊनचे सील काढून शेतकर्याना दिलासा द्यावा अशी विनंती मी फडणवीसांकडे केली आहे. शेतकऱ्यांसाठी जे काही करावे लागेल ते करण्याची आमची तयारी आहे.” त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढ्यासाठी अभिजित पाटील भाजपला मदत करणार का? हे पाहणे आवश्यक असणार आहे.