सध्याचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. ओपनएआयने Chatgpt लॉन्च केले. त्यानंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांनी आपले AI टूल लॉन्च केले आहेत. त्यानंतर जगभरात अनेक ठिकाणी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. या स्पर्धेत भारत देखील आघाडीवर आहे. इंटेलिजेंट डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी NetApp ने नुकताच क्लाउड कॉम्प्लेक्सिटीवर जारी केलेला अहवाल AI मध्ये कोणता देश आघाडीवर आहे आणि कोण मागे आहे हे दर्शवत आहे. हा अहवाल एक प्रकारे कोणता देश AI चा वापर कसा करतो यावर तयार करण्यात आला आहे.
नेटॲपच्या अहवालानुसार भारत, सिंगापूर, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स सारखी राष्ट्रे AI अवलंबन आणि त्याचा वापर करण्यात आघाडीवर आहेत. याउलट, स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी सारखे देश या तंत्रज्ञानाच्या प्रगतीत पिछाडीवर आहेत. हा अहवाल तयार करण्यासाठी १० देशांमधील १,३०० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
भारत, सिंगापूर, यूके आणि यूएसए सारख्या आघाडीच्या देशांमधील ६० टक्के कंपन्यांकडे AI प्रकल्प सुरू आहेत. चालत आहेत याउलट स्पेन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, जपान यांसारख्या एआय-मागे असलेल्या देशांमधील केवळ ३६ टक्के कंपन्यांनी अशाच प्रकारचे एआय उपक्रम सुरू केले आहेत.