Rajnath Singh : आज (29 एप्रिल) संरक्षण मंत्री आणि लखनौ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजनाथ सिंह यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात लखनऊमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.
राजनाथ सिंह यांना सलग तिसऱ्यांदा त्यांना लखनौच्या जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. तर नामांकनासाठी आयोजित रोड शोपूर्वी राजनाथ सिंह यांनी शहरातील हनुमान सेतू मंदिरात दर्शन व पूजा केली. त्यांनी भगवान शंकराला जलाभिषेक केला आणि नंतर हनुमानजींचे आशीर्वाद घेतले आणि रोड शोला सुरुवात केली.
रोड शोमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि त्यांना विजयाचा आत्मविश्वास दिसत होता. तर राजनाथ सिंह यांच्या रोड शोमध्ये समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. रोड शोमध्ये भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.