केंद्रीय महिला विकास मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील तिसऱ्यांदा अमेठी लोकसभेसाठी अर्ज भरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार स्थापनेबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते.
“अमेठीच्या सेवेसाठी, मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमेठीमध्ये गेल्या 5 वर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 1,14,000 घरे बांधण्यात आली आहेत, 1.5 लाख कुटुंबांना वीज जोडणी मिळाली आहे आणि 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीएम-किसान सन्मान मिळाला आहे. …मला आशा आहे की लोक पंतप्रधान मोदींना, भाजपला आशीर्वाद देतील,” असे त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
अमेठी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी रोड शो केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
रोड शो अमेठीच्या रस्त्यांवरून जात असताना लोकांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. तत्पूर्वी स्मृती इराणी यांनी त्यांच्या निवासस्थानी पूजा केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी, इराणी यांनी अमेठीच्या विविध भागातील लोकांची स्कुटरवरून भेट घेतली.
स्मृती इराणींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, मात्र काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या जागेवरून राहुल गांधी पुन्हा रिंगणात उतरतील, अशी अटकळ असताना काँग्रेसने अद्याप या जागेवरून आपला उमेदवार घोषित केलेला नाही. खरेतर राहुल गांधी यांनी अमेठीतून तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठीमधून राहुल गांधी यांचा पराभव केला.त्यामुळे काँग्रेसची पारंपरिक जागा समजल्या जाणाऱ्या अमेठीतला उमेदवार ठरण्यासाठी यावेळी बराच विलंब झाला आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यातला नेमका अमेठीचा उमेदवार कोण असणार हे ठरत नसल्यामुळे वेळ लागत असल्याचे तर्कवितर्क केले जात आहे.
दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी सांगितले की, पक्ष उत्तर प्रदेशच्या प्रलंबित जागांसह लोकसभा उमेदवारांची पुढील यादी दोन दिवसांत जाहीर करेल.
अमेठी इथली निवडणूक २० मे रोजी होणार असल्यामुळे ३ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.