लोकसभा निवडणुकीत सुरतमध्ये भाजपाचा पहिला उमेदवार विजयी झाला होता. विरोधी पक्षातील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने सुरतमध्ये भाजपाने मतमोजणीआधीच विजयाचे खाते उघडले. त्याचप्रमाणे आता मध्ये प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी अशीच एक घटना घडली आहे. इंदोरमध्ये काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. इंदोरमधील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे इंदोरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.
https://twitter.com/KailashOnline/status/1784833669850403270/photo/1
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कैलास विजयवर्गीय यांनी काँग्रेस उमेद्वाराबाबतचा आपला फोटो शेअर केला आहे. काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांचे भाजपात स्वागत असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. इंदोर लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे.