CM Revanth Reddy : दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना समन्स पाठवले आहे. हे प्रकरण गृहमंत्री अमित शाह यांच्या संपादित व्हिडिओशी संबंधित आहे. रेवंथ रेड्डी यांना दिल्ली पोलिसांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या व्हिडिओ प्रकरणी समन्स बजावले आहे. अमित शाह यांचा एक व्हिडीओ एडिट करून चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांचे मॉर्फ केलेले व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांना समन्स बजावले.
दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना पाठवलेल्या समन्समध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना 1 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटिशीमध्ये देण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी ज्याचा व्हिडीओ एडिटींगशी संबंध आहे त्याला देखील चौकशीसाठी घेऊन येण्याचे आदेशामध्ये म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी वेगळंच विधान केलं होतं पण सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये भलतंच दाखवण्यात आलं आहे, असा आरोप रेवंथ रेड्डी यांच्यावर करण्यात आला आहे.