लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे ७ मे ला होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान महायुतीकडून भाजपाने साताऱ्यात उदयनमहाराज भोसले यांना तिकीट दिले आहे. आज पंतप्रधान मोदींनी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर, इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
साताऱ्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”काँग्रेसने ४० वर्षांपासून सैनिकांना वन रँक वन पेन्शनपासून दूर ठेवले. खोटे बोलण्यात काँग्रेस पक्ष फार तरबेज आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू केले नाही. मात्र कलम ३७० आम्ही हटविले. सातारा जिल्हा देशभक्तांची तीर्थक्षेत्रांपेक्षा कमी नाही. साताऱ्यात भगवा फकडत राहिला आहे. मी आज तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. आज येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत.”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”२०१३ मध्ये मला भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले त्यानंतर मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या संधीपासून मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. त्यामुळेच मला १० वर्षांत आदर्श विचारांनी जगण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याची भूमी शूर वीरांची भूमी आहे.” दरम्यान साताऱ्यात उदयनमहाराज आणि महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांच्यात लोकसभा निवडणुकीची लढत होणार आहे.