लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. महायुतीने पुण्यात मुरलीधर मोहोळ, मावळमध्ये श्रीरंग बारणे, बारामतीमधून सुनेत्रा पवार आणि शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिले आहे. ७ आणि १३ मे ला या जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान आजच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली.
पुण्यातील रेसकोर्स मैदानावर झालेल्या सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी कस काय पुणेकर? असा विचारत उपस्थितांची मने जिंकली. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ”या भूमीने अनेक संत आणि समाजसेवक देशाला दिले आहेत. पुणे जितके प्राचीन आहे टीकेचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुणे तिथे काय उणे? काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधा देखील उपलब्ध नाव्ह्या. मात्र १० वर्षात आपण मूलभूत सुविधा पूर्ण केल्याचं मात्र प्रत्येक वर्गातील गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”
दरम्यान भाजपाने पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देशासह राज्याच्या जनतेचे लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे लागले आहे.