भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि तेलंगणातील निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. . 400 पार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते लोकसभा मतदारसंघात चार जाहीर सभांना संबोधित करतील आणि मतदारांचे आशीर्वाद घेणार आहेत. भाजपने आपल्या X हँडलमध्ये पंतप्रधान मोदींचा आजचा निवडणूक प्रचार कार्यक्रम शेअर केला आहे.
भाजपच्या एक्स हँडलनुसार, पंतप्रधान मोदी आज एका दिवसात चार जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत. ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता तेलंगणामध्ये होणाऱ्या आजच्या मोदी यांच्या जाहीर सभेने होणार आहे. पंतप्रधान मोदींची सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील माढा येथे जाहीर सभा होणार आहे. यानंतर ते उस्मानाबाद येथे दुपारी एक वाजता भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करतील. दुपारी अडीच वाजता पंतप्रधान लातूरमध्ये निवडणूक प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रातून तेलंगणाला रवाना झाल्यानंतर दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान जहीराबादमध्ये भाजपच्या जाहीर सभेला संबोधित करतील.
लोकसभा निवडणुकीच्या जल्लोषात देशातील 14 राज्यांमध्ये मतदान पार पडले आहे. तर अनेक राज्यांमध्ये मतदान अद्याप बाकी आहे. सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख प्रचारक जोमाने प्रचार करत आहेत. सर्व स्टार प्रचारक आपापल्या पक्षांचा विजय निश्चित करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.