India summons Canadian diplomat टोरंटो येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘खलिस्तान’ समर्थक घोषणा देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि अनेकजण उपस्थित होते.मात्र यानंतर भारताने सोमवारी कॅनडाच्या उपउच्चायुक्तांना स्टीवर्ट व्हीलर यांना जाब विचारला असून टोरंटो येथील कार्यक्रमाबद्दल निषेध नोंदवला आहे.
कॅनडा-आधारित CPAC टीव्हीने जारी केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पंतप्रधान ट्रूडो खालसा दिनानिमित्त त्यांच्या भाषणासाठी मंचाजवळ आले तेव्हा ‘खलिस्तान झिंदाबाद’चा नारा अधिक जोरात वाढत असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी भाषण सुरू केले तेव्हा त्याच घोषणा पुन्हा उफाळून आल्या. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग आणि टोरंटोचे महापौर ऑलिव्हिया चाऊ यांसारख्या नामांकित व्यक्तीही यावेळी उपस्थित होत्या.
शहराच्या सर्वात मोठ्या वार्षिक मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम, हजारो उपस्थितांना डाउनटाउन टोरंटोकडे आकर्षित करणारा कार्यक्रम रविवारी पार पडला. ट्रूडो यांनी आपल्या भाषणात, कॅनडातील शिखांचे हक्क आणि स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि द्वेष आणि भेदभावापासून समुदायाचे रक्षण करण्याचे वचन दिले. मात्र अशा लोकांना या कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगी दिल्याबद्दल भारत सरकारनं तीव्र चिंता व्यक्त केली आणि तीव्र निषेध व्यक्त केला.कॅनडामध्ये फुटीरतावाद, अतिरेकी आणि हिंसाचाराला दिलेला राजकीय आश्रय हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते, असेही भारताने एका निवेदनात म्हंटले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) कार्यक्रमातील घोषणांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या कृतीचा केवळ भारत-कॅनडा संबंधांवरच परिणाम होत नाही तर कॅनडातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या वातावरणाला स्वतःच्या नागरिकांचे नुकसान होण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे भारताने म्हंटले आहे . कॅनडाच्या पंतप्रधानांनी वैयक्तिकरित्या संबोधित केलेल्या कार्यक्रमात ‘खलिस्तान’ संदर्भात फुटीरतावादी घोषणा दिल्याच्या संदर्भात कॅनडाच्या उपउच्चायुक्तांना आज परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले होते.टोरंटो येथील कार्यक्रमानंतर भारताकडून उच्चायुक्त स्टीवर्ट व्हीलर यांना समन्स बजावण्यात आले आहे.
ब्रिटिश कोलंबियामध्ये 18 जून रोजी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा “संभाव्य” सहभाग असल्याचा ट्रूडो यांच्या सप्टेंबरमध्ये आरोप झाल्यानंतर आरोपानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध गंभीर ताणले गेले आहेत. भारतानं ट्रुडो यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या कठीण काळातून जात आहेत