भारतीय नौदल हे जगातील सर्वात तिसऱ्या क्रमाकांचे शक्तिशाली नौदल समजले जाते. दरम्यान आज ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. साऊथ ब्लॉक येथील ठिकाणी गार्ड ऑफ ऑनर मिळाल्यानंतर दिनेश त्रिपाठी यांनी विद्यमान ऍडमिरल हरी कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.
19 एप्रिल रोजी केंद्र सरकारकडून व्हाईस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांची भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते सध्या नौदलात नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. 30 नोव्हेंबर 2021 रोजी देशाचे 25 वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणारे ॲडमिरल आर हरी कुमार 30 एप्रिल रोजी दुपारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी यांनी आजच नवे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. याआधी साऊथ ब्लॉकमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. परंपरेनुसार त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. भारतीय नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आई रजनी त्रिपाठी यांचे आशीर्वाद घेतले.