भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील निवडणूक सभेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत बाळूमामा आणि येळकोट येळकोटचा नारा दिला. आणि मराठी भाषेत भाषण सुरू केले. ही वारकरी संप्रदायाची भूमी असून विकसित भारतासाठी मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेसने 60 वर्षात जेवढे विकास काम केले त्यापेक्षा जास्त विकासकामे भाजप सरकारने 10 वर्षात केली आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले. तसेच आम्ही सुमारे 80 कोटी लोकांना मोफत अन्न दिले. देशात विकासाची कामे जोरात सुरू आहेत. याचे श्रेय माझे नसून ज्यांनी मला निवडून दिले त्यांचे श्रेय जाते.
काँग्रेसने 60 वर्षात पायाभूत सुविधांवर जेवढा पैसा खर्च केला तेवढाच पैसा आम्ही 10 वर्षांत खर्च केला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा खरपूस समाचार घेत ते म्हणाले की,” एका नेत्याने 15 वर्षांपूर्वी मढ्यात पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी मावळत्या सूर्यापर्यंत शपथही घेतली पण तरीही तो नेता या भागात पाणी पोहोचवू शकला नाही . आता त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे”.
पीएम मोदी म्हणाले की, 2014 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी सर्व शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित 100 पैकी 63 प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. विदर्भ असो वा मराठवाडा, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळावे लागत आहे. देशाने काँग्रेसला 60 वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या 60 वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले आहेत, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही.असे मोदी म्हणाले आहेत.
दिल्लीतून शेतकऱ्यांच्या नावे पैसे निघाले की काँग्रेस त्यावर हात मारत असे. आता तसं घडत नाही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर कडाडून टीका केली.
महाराष्ट्रातले दिग्गज नेते कृषी मंत्री होते त्यांनी काय उस दरांच्या एफआरपीसाठी काय केले ? सहकारी साखर कारखान्यांचा प्रश्न मी त्यांच्याकडे घेऊन जायचो. मात्र त्या दिग्गज नेत्याने सहकारी साखर कारखान्यांची प्राप्तीकराची समस्या सोडवली नाही. आम्ही सहकारी साखर कारखान्यांना १० हजार कोटींचा दिलासा प्राप्ती कराच्या प्रश्नात दिला. ९० च्या दशकापर्यंत त्यांनी हा प्रश्न भिजत ठेवला होता. असे म्हणत पंतप्रधानांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.