भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राईम पथकाने दोन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी आणि काँग्रेसशी संबंधीत आहेत.अमित शाह (Amit Shah) यांच्या दोन सभांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने ए़डिटिंग करत ते व्हायरल करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी आहेत. सतीश वनसोल काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांचे पीए आहेत. तर आर बी बारीया आम आदमी पार्टीचे दाहोद जिल्हा प्रमुख आहेत. या दोघांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचे समोर आले आहे.
या कथित ‘फेक’ व्हिडिओमध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असे म्हणत आहेत की भाजप देशातील आरक्षणाच्या विरोधात आहे. मात्र, त्यानंतर भाजपने ही व्हायरल क्लिप बनावट असल्याचे जाहीर केले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समन्स बजावण्यात आलेल्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेसच्या सहा सदस्यांचा समावेश आहे. त्यांना,रेड्डी यांना अनेक राज्यांतील इतर व्यक्तींसह, दिल्लीतील द्वारका येथील IFSO युनिटमध्ये 1 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी एकूण १६ जणांना समन्स बजावले असून १ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.