दिल्लीतील एका रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समोर आले होते. दिल्लीतील गांधी नगर भागात असलेल्या चाचा नेहरू हॉस्पिटलच्या आवारात बॉम्ब असल्याची माहिती ईमेलद्वारे प्राप्त झाली होती. त्यानंतर पीसीआरला कॉल करण्यात आला होता. याची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली, त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा म्हणून रुग्णालयाचा परिसर रिकामा केला.
पोलिसांनी रुग्णालयाच्या आत आणि बाहेर शोध घेतला परंतु अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. ज्या ईमेलद्वारे हॉस्पिटलला हा मेल पाठवण्यात आला होता, त्या ईमेलच्या आयपी ॲड्रेसचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान अशा अफवांचे ईमेल किंवा फोन येण्याचे प्रमाण काही वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका रुग्णालयात देखील अशाच प्रकारे बॉम्ब ठेवल्याची अफवा समोर आली होती.