१ जूनपासून अमेरिकेमध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी संघ निवडण्यासाठी आयसीसीने १ मे ही श्वेताची तारीख दिली होती. दरम्यान आज वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ वर्ल्ड कप खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या उपकर्णधार असणार आहे. अनेक नवोदित खेळाडूंना या संघात स्थान मिळाले दिसून येत आहे, तर अनेक खेळाडूना डच्चू देण्यात आला आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात २ विकेटकिपरचा समावेश करण्यात आला आहे. यात रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा समावेश असणार आहे. तर केएल राहुल ला यंदा संघात स्थान मिळालेलं नाहीये. आपण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात कोण कोण खेळाडू असणार आहेत. हे जाणून घेऊयात.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेन्द्र चहल, अर्षदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी करण्यात आला आहे.