(NEET) देणाऱ्या विद्यार्थ्याने रविवारी राजस्थानमधील कोटा येथे आत्महत्या केल्यानंतर एक नवीन प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी पुन्हा कोटा येथे NEET ची तयारी करणाऱ्या एका कोचिंग विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे . माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या संदर्भात मुलाच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही आठवी घटना आहे.शिक्षक नगरमध्ये कोचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत.पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची तयारी कोटामध्ये करून घेतली जाते.
उपनिरीक्षक गोपाल लाल बैरवा यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षापासून तलवंडी येथील पीजीमध्ये राहून मामा आणि भाचा वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एनईईटीचे प्रशिक्षण घेत होते. मृत रघुनाथ लोधी राजपूत हा २० वर्षीयतरुण हा ढोलपूर जिल्ह्यातील दिंडोली येथील रहिवासी होता. तसेच त्याचा १७ वर्षीय भाचा रोहित हाही त्याच्यासोबत राहत होता. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता भाचा रोहित घरातून सलूनसाठी निघाला. 11 वाजता तो परत आला तेव्हा त्याला त्याचा मामा भरत आत्महत्या केलेल्या अवस्थेत दिसला. मागच्या दाराने तो खोलीत शिरला. यानंतर त्यांनी पीजी मालक आणि इतर लोकांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळी संपूर्ण तपास करून पोलिसांनी मृतदेह शवागारात हलवला.
पोलिसांनी सांगितले की, भरत हा विद्यार्थी 5 मे रोजी NEET-UG परीक्षेचा तिसरा प्रयत्न देणार होता. पहिल्या दोन वेळा त्याची निवड झाली नाही. त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे – “मी हे करू शकणार नाही.” तो ३ मे रोजी NEET च्या पेपरला बसण्यासाठी निघणार होता, त्याआधीच त्याने अचानक आत्महत्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
दरम्यान कोटामधील कोचिंग इन्स्टिट्यूटचे शिक्षक, वसतिगृह आणि पीजी ऑपरेटर आणि शहरातील रहिवाशांनी पालकांना त्यांच्या मुलांशी दररोज बोलून त्यांचे मनोबल वाढवत राहण्याचे आवाहन केले आहे.