राज्याच्या वातावरणात अनेक बदल होताना दिसून येत आहेत. मात्र उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कडाक्याचे ऊन जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसाठा देखील हळू हळू कमी होता दिसून येत आहे. धरणसाठ्यातील पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट गडद झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत एप्रिल महिन्यातच नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले आहेत. याबाबतच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. यामुळे त्याचा परिणाम धरणसाठ्यावर झाला आहे. तसेच यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याचे पाण्याची घट होत आहे. सध्या राज्यात साडे तीन हजारांपेक्षा जास्त ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात त्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले आहेत. याबाबतच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.