भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राम-शिव यांच्यावरील वादग्रस्त विधानावर टीका केली आहे आणि असे म्हटले की काँग्रेसचा “फोडा आणि राज्य करा” हाच डीएनए आहे आणि त्यांचा वर्षानुवर्षांचा हाच इतिहास आहे.
” काँग्रेसनी हिंदू समाजात जाती, भाषा आणि इतर आधारावर फूट पाडली आहे. आता ते पुन्हा एकदा फूट पाडू पाहत आहेत, आज त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यांना आमच्या देवतांमध्येही फूट पाडायची आहे. ते म्हणतात की श्रीराम हे ‘पाखंड’ आहे, ते ‘जय श्री राम’ला शिव्या देतात आणि म्हणत आहेत की आम्ही रामाशी लढू आणि शिव रामाशी लढेल ,’
“यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येते. एकीकडे खर्गेचा मुलगा म्हणतो ‘सनातना हा रोग आहे’, खर्गेनी म्हटले आहे की, ‘मोदी जिंकले तर सनातन येईल’ म्हणून हा सनातन विरोध, हिंदू विरोध, राम विरोधीचा चेहरा असलेला काँग्रेस पक्ष खर्गेंच्या विधानामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.
दोन दिवसापूर्वी जांजगीर-चंपा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शिवकुमार दहरिया यांच्यासाठी मते मागताना खर्गे यांनी राम -शिव ह्या विषयाबाबत वादग्रस्त टिपण्णी केली होती.
ते म्हटले होते, “हा उमेदवार शिवकुमार दहरिया आहे. त्याचे नाव शिवकुमार आहे त्यामुळे तो रामाशी स्पर्धा करू शकतो कारण तो शिव आहे, तसे तर माझ्या नावातही शिव आणि अर्जुन आहे”. हिंदू धर्म फक्त भाजपचा नाही तो सर्वांचा आहे. मात्र भाजप त्याआडून मतं मागतो आहे.
यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही काँग्रेसवर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “राम आणि शिव हे वेगळे नाहीत… भगवान रामांनी स्वतः भगवान शिवाची पूजा केली. दोघेही एकमेकांना पूरक आहेत… मात्र आता यातून काँग्रेसचे वास्तव समोर येत आहे. भारतातील सनातन परंपरेचा अपमान करण्याची काँग्रेसची प्रवृत्ती आहे. त्याची बदनामी करणे, भारताच्या श्रद्धेशी खेळणे आणि काँग्रेस अध्यक्ष आपल्या भाषणात तेच बोलत आहेत, असे ते म्हणाले आहेत.
“ते (काँग्रेस) भारताच्या सनातनच्या श्रद्धांशी खेळून आपली हरलेली निराशा काढत आहेत. निवडणुकीदरम्यान असे संवेदनशील मुद्दे उचलून काँग्रेस भारताच्या श्रद्धेचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे.”असे योगी म्हणाले आहेत.