Chitra Wagh On Thckeray Group : आज (2 मे) भाजप नेत्या चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. एक पॉर्नस्टार ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये असल्याचा खळबळजनक दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही फोटो देखील दाखवले आहेत.
पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे गटाने नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. कारण अदुबाळ नाईटलाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट कंपनीच्या उबाठाच्या जाहिरातीमध्ये जे पात्र आहे ते पॉर्नस्टारचं आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
राज्यामध्ये पॉर्न संस्कृती आणण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये जे पात्र आहे ते पॉर्नस्टार आहे. तसेच जाहिरातीतील तो पॉर्नस्टार विचारतो की, महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? हाच तो पॉर्नस्टार जो लहान वयांच्या मुलींसोबत अश्लील चित्रण करतो. आता तोच बापाची भूमिका करणारा हा व्यक्ती उल्लू अॅपवरती घाणेरडे कृत्य करतानाच्या क्लिप्स आहेत, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
निवडणुकीच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून नेहमी महिलांचा अपमान करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील महिलांचा वारंवार अपमान केला आहे, अशी टिकाही वाघ यांनी केली.