लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया आघाडी आणि काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना जाहीरमण्यावर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील आपल्या प्रत्येक प्रचारसभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत आहेत. मी जिवंत असेपर्यंत धार्मिक आधारावर आरक्षण लागू होऊ देणार नाही असे ते सांगत आहेत.
लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे ७ मे रोजी होणार आहे. त्याआधी नरेंद्र मोदींच्या म्हणजेच भाजपाच्या उमेदवारांनी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत खर्गे यांनी मोदींना पात्र लिहीले आहे. आम्हाला चिंता आहे की तुमच्यामध्ये खूप निराशा आणि चिंता आहे जी तुम्हाला पंतप्रधानांच्या कार्यालयाला न शोभणारी भाषा वापरण्यास प्रवृत्त करत आहे. एक खोटे हजारवेळा बोलले म्हणून ते सत्य होत नाही.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, युवा न्याय, नारी न्याय, किसान न्याय, श्रमिक न्याय आणि हिसेदारी न्याय यासह लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने जाहीरनाम्यात दिलेल्या हमींचा पुनरुच्चार केला. तसेच टीका करण्यापेक्षा जाहीरनाम्यावर चर्चा करूयात असे म्हणत त्यांनी मोदींना जाहीरनाम्यावर चर्चेचे आव्हान दिले आहे.