देशातील वातावरण सातत्याने बदलाताना दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत आहे. आता कालपासून महिना सुरु झाला आहे. या महिन्यात देशातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. देशातील बहुतांश भाग हा सरासरी तापदायक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मे महिन्यात उष्णतेची लाट देशभरात येण्याची शक्यता आहे. कोकणातील तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाडा तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. सध्या राज्यात देखील तापमान खूप वाढत आहे. नागरिकांच्या अंगांची लाहीलाही होत आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात नागरिकांनी घराबाहेर पडू नये किंवा बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासानाने केले आहे.